What is the Rasagrahanरसग्रहण म्हणजे काय ?

मराठी व्याकरण

Marathi Grammar

What is the Rasagrahanरसग्रहण म्हणजे काय ?

 

● कविनेचा सर्व बाजूनी, पूर्णांगाने आस्वाद घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. कवितेचा छंद प्रकार, भाषिक वैशिष्ट्ये शब्द, आशयाची मांडणी, सहजता, आवाहकता या घटकांची ‘विस्ताने मांडणी करणे रसग्रहणात आवश्यक असते.

कवितेतील प्रतीके व प्रतिमा उलगडून दाखवणे, त्यातील भावसौदर्य, अर्थसौदर्य समजावून सांगणे हे रसग्रहणात महत्वाचे असते. कवितेतून मिळणारी शिकवण, संदेश किंवा भौतिक विचार, नेमकेपणाने सांगणे आवश्यक असते. कवितेतून होणारी रसांची निष्पती व त्याचे ग्रहण (आस्वाद) करणे म्हणजे कविनेचे सर्वांगाने रसग्रहण होय.

रसग्रहण सोडवण्यासाठीचा अभ्यास कसा करावा.

कवीचे नाव, संदर्भ, प्रस्तावना, वाड्यमप्रकार या रसग्रहणातील मुद्द्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवितेच्या सुरुवातीला दिलेला परिचयात्मक मजकूर बारकाईने वाचावा.

कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, भाषिक वैशिष्ट‌ये आवड नाआवड यांसाठी मार्गदर्शकानीत कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.

पुढील तीन मुद्दयांना अनुसरून तीन परिच्छेदान रसग्रहण करणे-

1) आशयसौंदर्य:

कवीचे नाव, कवितेश विषय, मध्यवर्ती कल्पना, संदर्भ ,संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित
अनुभव आदी मुद्दयांना अनुसरून माहिती लिहावी. साधारपणे कोणत्याही दोन पंपक्तीसाठी हे मुद्दे सारखेच राहतील.

2) काव्य सौंदर्य :

यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस ,विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना या विषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तीना अनुसरून लिहावी लागेल. यासाठी कवितेतील भावार्थ समजून बारकाईने अभ्यास करावा.

3) भाषिक . वैशिष्टये :

यामध्ये कवीची भाषाशैली कोणान्या प्रकारची आहे. ( ग्रामीन, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यापैकी कोणती) आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार इत्यादी मुद्दयांना धरून माहिती लिहावी.हे मुद्दे प्रत्येक कवितेत साधारपणे सारखे असतात.

उदाहरण:

हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ।।’

उत्तर :

आशयसौंदर्य :

श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य :

श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये :

पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगाचा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

उदाहरण:

‘पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’

उत्तर :

आशयसौंदर्य :

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘या झोपडीत माझ्या’ या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.

काव्यसौंदर्य :

प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवींना म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये :

कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. दौलत,पैसा, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – ‘या झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच ‘या हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही अंगाने अर्थवाही झाला आहे.

रसग्रहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *