Tense in Marathi क्रियेचा काळ दर्शविणाऱ्या क्रियापदाच्या 3 forms of Verbs रूपाला ( Tense ) काळ असे म्हणतात.सोप्या भाषेत सांगायचे झाले तर,एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडली आहे याचा बोध होतो त्या वेळेला( Tense )काळ असं म्हणतात.

Tense in Marathi

Tense in marathi काळ व काळाचे प्रकार

काळाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

  1. वर्तमान काळ ( Present tense )
  2. भूतकाळ ( Past tense )
  3. भविष्यकाळ ( Future tense )

 

वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ
Present tense Past tense Future tense
साधा  I write I wrote I shall write
मी लिहितो / लिहते मी लिहले मी लिहीन
चालू I am writing I was writing I shall be writing
मी लिहत आहे मी लिहत होतो / होते मी लिहीत असेल
पूर्ण I have written I had written I Shall have written
मी लिहिलेले आहे मी लिहिलेले होते मी लिहिलेले असेल
चालू पूर्ण I have been writing I had been writing I shall have been writing
मी लिहित आलेलो / आलेली आहे मी लिहीत आलेलो होतो मी लिहीत आलेलो असेल
मी लिहीत आलेली होते मी लिहीत आलेली असेल

 

वर्तमान काळ ( Present Tense )

वर्तमानकाळ हा सध्या चालू असणारी किंवा नियमित घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा काळ होय. वर्तमान काळाचे एकूण चार उपप्रकार आहेत.

 

साधा वर्तमान काळ ( Simple Present Tense )

जी क्रिया किंवा कृती सध्याच्या काळात वर्तमान काळात घडते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात.

               कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप

नियम : He, She , It व एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लागतो.

एकवचन अनेकवचन
I write We write
You write You write
He Writes They write
She Writes
It writes

उदा.

चालू वर्तमान काळ ( Present Continuous Tense )

बोलताना वर्तमान काळात एखादी क्रिया चालू आहे असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू वर्तमान काळ असे म्हणतात.

     कर्ता + am किंवा are किंवा is + क्रियापदाचे चौथे  रूप

नियम : I असल्यास am घ्यावे. We,You,They व अनेकवचनी नाम असल्यास are घ्यावे.
He,She,It व एकवचनी नाम असल्यास is घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I am writing We are writing
You are writing You are writing
He is writing They are writing
She is writing
It is writing

उदा.

पूर्ण वर्तमान काळ (Present Perfect Tense )

वर्तमान काळात एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असे जेव्हा दर्शविले जाते त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात.

   कर्ता + have किंवा has + क्रियापदाचे 3  रूप

नियम : I ,We ,You व अनेकवचनी नाम असल्यास have घ्यावे.He,She ,It व एकवचनी नाम असल्यास has घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I have written. We have  written.
You have written. You have written.
He has  written. They have  written.
She has  written.
It has  written.

उदा.

चालू पूर्ण वर्तमान काळ ( Present Perfect Continuous Tense )

भूतकाळात सुरू झालेली एखादी क्रिया काही काळापासून चालू राहिली आणि ती क्रिया अजूनही चालूच आहे असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात.

          कर्ता + have किंवा has + been + क्रियापदाचे 4  रूप

नियम : I,We,You,They व अनेकवचनी नाम असल्यास have घ्यावे.He,She,It व एकवचनी नाम असल्यास has घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I have been writing We have   been writing
You have  been writing You have been writing
He has been writing They have   been writing
She has been writing
It has been writing

उदा.

भूतकाळ ( Past Tense )

वाक्यातील क्रियापदाचा अर्थावरून क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ भूतकाळ असतो.भूतकाळ चे एकूण चार उपप्रकार आहेत.

 

साधा  भूतकाळ ( Simple Past Tense )

भूतकाळात एखादी क्रिया घडली असा जेव्हा सहज उल्लेख करतात त्याला साधा भूतकाळ असे म्हणतात.

          कर्ता + क्रियापदाचे 2  रूप

 

एकवचन अनेकवचन
I wrote We wrote
You wrote You wrote
He wrote They wrote
She wrote
It wrote

उदा.

चालू भूतकाळ ( Past Continuous Tense )

भूतकाळात एखादी क्रिया चालू होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू भूतकाळ असे म्हणतात.

       कर्ता + was किंवा were + क्रियापदाचे 4 रूप

नियम : I,We,You,They व अनेकवचनी नाम असल्यास were घ्यावे.He,She,It व एकवचनी नाम असल्यास was घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I was writing We were writing
You were writing You were writing
He was writing They were writing
She was writing
It was writing

उदा.

पूर्ण भूतकाळ (Past Perfect Tense )

भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.

 कर्ता + had + क्रियापदाचे 4 रूप

 

एकवचन अनेकवचन
I had written. We had  written.
You had written. You had written.
He had  written. They had  written.
She had  written.
It had  written.

उदा.

चालू पूर्ण भूतकाळ ( Past Perfect Continuous Tense )

भूतकाळात सुरू झालेली एखादी क्रिया काही काळापासून चालू राहिली आणि ती क्रिया अजूनही चालूच होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.

   कर्ता + had + been + क्रियापदाचे 4 रूप
एकवचन अनेकवचन
I had been writing We had been writing
You had been  writing You had been writing
He had been writing They had been writing
She had been writing
It had been writing

उदा.

 

भविष्यकाळ ( Future tense )

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया पुढे होणार आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ भविष्यकाळ असतो. भविष्यकाळ चे एकूण चार उपप्रकार आहेत.

 

 

साधा  भविष्यकाळ ( Simple Future Tense )

भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल असा जेव्हा उल्लेख करतात त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतात.

      कर्ता + shall  किंवा will + क्रियापदाचे 1 रूप

नियम : I,We  असल्यास Shall व इतरत्र will घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I shall write We shall write
You will write You will write
He will Writes They will write
She will Writes
It will writes

उदा.

चालू भविष्यकाळ ( Future Continuous Tense )

भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू भविष्यकाळ असे म्हणतात.

 कर्ता + shall  किंवा will + be +  क्रियापदाचे 4 रूप

नियम : I,We  असल्यास Shall व इतरत्र will घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I shall be writing We shall be writing
You will be writing You will be writing
He will be writing They will be writing
She will be writing
It will be writing

उदा.

पूर्ण भविष्यकाळ (Future Perfect Tense )

भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे जेव्हा दर्शविले जाते त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

 कर्ता + shall  किंवा will + have +  क्रियापदाचे 3 रूप

नियम : I,We  असल्यास Shall व इतरत्र will घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I shall have written. We shall  have  written.
You will have written. You will have written.
He will have  written. They will have  written.
She will have  written.
It will have written.

उदा.

चालू पूर्ण भविष्यकाळ ( Future Perfect Continuous Tense )

भविष्यकाळात सुरू झालेली एखादी क्रिया काही काळापासून चालूच राहिली आणि ती क्रिया अजूनही चालूच असेल असे दर्शविले जाते त्याला चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

 कर्ता + shall  किंवा will + have +been +  क्रियापदाचे 4 रूप

 

नियम : I,We  असल्यास Shall व इतरत्र will घ्यावे.

एकवचन अनेकवचन
I shall have been writing We shall have been writing
You will have been  writing You will have been writing
He will have been be writing They will have been writing
She will have been writing
It will have been writing

उदा.

 

Read More: 12 Punctuatuions Marks in Marathi, 26 Word Pattern & Marathi Chaudakhadi with English Pronunciation

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *